देवी लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी अनेक जण पूजा पाठ करतात. काही जण ज्योतिषीय तोडगेही अवलंबतात. ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा घरात वास होण्यापूर्वी काही संकेत मिळतात. याबाबत आधीच कल्पना मिळाली तर जातकाला देवी लक्ष्मीचं योग्य पद्धतीने स्वागत करता येतं. अन्यथा देवी लक्ष्मी रुसू शकते.
सकाळी निद्रावस्थेतून जागं होताच शंखाचा आवाज ऐकू आल्यास समजून जायचं की, देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात वास करणार आहे. तत्पूर्वी संपूर्ण घर गंगाजलने स्वच्छ करावं. मुख्य दाराजवळ मोहरीचा दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रसन्नपणे प्रवेश करते.
सकाळी रस्त्यात कोणी झाडू मारतान दिसलं की देवी लक्ष्मीची लवकरच कृपा होणार हे समजून जायचं. घराच्या मुख्य दार गंगाजल शिंपडून स्वच्छ करावं. तसेच देवीच्या स्वागतासाठी रांगोळी काढावी.
घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन गणलं जातं. त्यामुळे घुबड दृष्टीक्षेपात पडल्यास देवी लक्ष्मी आपल्या आयुष्यात भरभराट देणार हे समजून जायचं.
स्वप्नशास्त्रातही देवी लक्ष्मीच्या आगमनाबाबत सांगितलं गेलं आहे. स्वप्नात सापाचं बिल दिसल्यास देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असल्याचं समजून जायचं.
घरातून बाहेर निघताना दुधाने भरलेलं भांडं दिसल्यास देवी लक्ष्मीचा शुभ संकेत समजावा. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी घरात पूजा पाठ करावा. तसेच देवीच्या आगमनाची तयारी करावी. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)