Chandra Gochar 2023 : जून महिन्यात चंद्र 13 वेळा करणार गोचर, या दिवशी असतील शुभ अशुभ योग
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. दर सव्वा दोन दिवसांनी चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. यामुळे शुभ अशुभ योग तयार होईल.
1 / 13
3 जून रोजी चंद्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. रात्री 12 वाजून 28 मिनिटांनी हा प्रवेश असेल. तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करताच ग्रहण सुटेल. दुसरं वृश्चिक राशीत कोणताच ग्रह नसल्याने शुभ अशुभ योगाची स्थिती नसेल.
2 / 13
5 जून रोजी चंद्र वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. पहाटे 3 वाजून 22 मिनिटांनी हा प्रवेश होईल. या राशीत कोणताच ग्रह नसल्याने शुभ अशुभ योगाची स्थिती नाही.
3 / 13
7 जून रोजी चंद्र धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. मकर राशीत पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी प्रवेश करेल. मकर राशीत कोणताही ग्रह नसल्याने युती आघाडी नाही.
4 / 13
9 जून रोजी चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. चंद्र कुंभ राशीत सकाळी 6 वाजून 1 मिनिटांनी प्रवेश करेल. चंद्र आणि शनिच्या युतीमुळे विष योग तयार होईल.
5 / 13
11 जून रोजी चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीत कोणताही ग्रह नसल्याने युती आघाडी होणार नाही.
6 / 13
13 जून रोजी चंद्र मीन राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. दुपारी 1 वाजून 32 मिनिटांनी चंद्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. यामुळे दोन योग तयार होतील. गुरुच्या सान्निध्यात आल्याने गजकेसरी योग, तर राहुमुळे ग्रहण योग तयार होईल.
7 / 13
15 जून रोजी चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. रात्री 8 वाजून 23 मिनिटांनी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करेल. यावेळी बुधासोबत युती होणार आहे.
8 / 13
18 जून रोजी चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. सकाळी 5 वाजून 12 मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करेल. या राशीत सूर्यदेव असल्याने चंद्र आणि सूर्याची युती होईल.
9 / 13
20 जून रोजी चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. या राशीत दुपारी 3 वाजून 58 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत मंगळ असल्याने चंद्रासोबत युती होणार असल्याने लक्ष्मीयोग तयार होईल. या राशीत शुक्र ग्रहासोबतच्या युतीमुळे कलात्मक योग तयार होईल.
10 / 13
23 जून रोजी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. चंद्र सकाळी 4 वाजून 17 मिनिटांनी प्रवेश करेल. या राशीत कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडीचा प्रश्न नाही.
11 / 13
25 जून रोजी चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. दुपारी 4 वाजून 17 मिनिटांनी हा प्रवेश असेल. या राशीत कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडीचा प्रश्नच नाही.
12 / 13
28 जून रोजी चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी हा प्रवेश असेल. या राशीत केतु ग्रहासोबत होणार असल्याने ग्रहण योग असेल.
13 / 13
30 जून रोजी सकाळी 10 वाजून 19 मिनिटांनी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या राशीत कोणताच ग्रह नसल्याने युती आघाडी होणार नाही.