Horoscope 2023 : शनि आणि सूर्याचा अभद्र योग संपुष्टात, चार राशींना होणार फायदा
Shani Surya Yog : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युती आघाडीमुळे मोठा फरक दिसून येतो. सूर्य आणि शनि काही तासांपूर्वी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आता स्थिती संपुष्टात आल्याने चार राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
1 / 6
ग्रहांमध्ये राजाचा दर्जा असलेला सूर्य आणि न्यायदेवता शनिदेव हे पिता पूत्र आहेत. पण या दोघांमध्ये पटत नाही. काही तासांपूर्वी हे दोन्ही एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तसेच एकमेकांवर वक्रदृष्टी होती. त्यामुळे या दोघांच्या तावडीत जातक सापडला की सळो की पळो करून सोडतात.
2 / 6
सूर्य उपासना
3 / 6
मेष राशीच्या जातकांना गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तसेच गेल्या काही दिवसांपासून असलेले कौटुंबिक वाद संपुष्टात येतील. तसेच नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. आरोग्य विषयक तक्रारी दूर होतील. प्रवासाचा योग जुळून येईल.
4 / 6
वृषभ राशीच्या जातकांना नोकरी आणि रोजगाराच्या नवी संधी मिळतील. उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायात प्रगती दिसून येईल. आईच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल. वडिलधाऱ्या व्यक्तींकडून मोलाचा सल्ला मिळेल. तसेच अनपेक्षितपणे चांगल्या घटना घडतील.
5 / 6
मिथुन राशीच्या जातकांना नोकरीत सकारात्मक बदल दिसतील. पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यात आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच हाती घेतलेल्या योजना यशस्वी होतील.
6 / 6
तूळ राशीच्या जातकांवरील सूर्य आणि शनि यांचा अशुभ प्रभाव दूर होईल. मीडिया, उद्योगपती आणि ग्लॅमर्स क्षेत्राशी निगडीत लोकांना फायदा होईल.