मकर संक्रांतीला गुरु-मंगळ ग्रहामुळे अर्धकेंद्र योग, तीन राशींना मिळणार लाभ

| Updated on: Jan 10, 2025 | 7:05 PM

ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि गुरु हे महत्त्वपूर्ण ग्रह आहेत. मकर संक्रांतीला या दोन्ही ग्रहांमुळे अर्धकेंद्र योग तयार होत आहे. या योगामुळे राशीचक्रावर परिणाम होईल. पण तीन राशीच्या जातकांना सर्वाधिक लाभ मिळेल. चला जाणून घेऊयात याबाबत

1 / 7
ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितीवर आधारित आहे. कोणता ग्रह कोणत्या स्थानात आणि राशीत बसला आहे यावरून भाकीत केलं जातं. मंगळ हा ग्रहमंडळातील महत्त्वाचा ग्रह आहे. त्याला सेनापतीचा दर्जा दिला गेला आहे. मंगळ ग्रह हा पराक्रम, ऊर्जा, युद्ध, सेना आणि शौर्याचा कारक आहे.

2 / 7
देवगुरु बृहस्पती या ग्रहाचं महत्व त्याच्या स्वभावामुळे अधिक महत्त्वाचं ठरतं. एखाद्या राशीत गुरु ग्रह मजबूत असेल तर त्याला कोणत्याच गोष्टीची चिंता भासत नाही. गुरु ग्रह हा धन, विवाह, कल्याण, संतान, ज्ञान, धैर्य आणि बुद्धिमतेचा कारक आहे.

3 / 7
वैदिक पंचांगानुसार, मकर संक्रांतीला म्हणजेच 14 जानेवारीला सकाळी 5 वाजून 32 मिनिटांनी मंगळ आणि गुरु ग्रहामुळे अर्धकेंद्र योग तयार होत आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून 45 डिग्रीवर असणार आहेत.

4 / 7
मंगळ आणि गुरु ग्रहाच्या अर्धकेंद्र योगामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम दिसून येईल. पण खासकरून तीन राशीच्या जातकांना लाभ होणार आहे. चला जाणून घेऊयात या राशींबाबत

5 / 7
कन्या राशीच्या जातकांसाठी गुरु आणि मंगळामुळ तयार होणारा अर्धकेंद्र योग लाभदायी ठरेल. कन्या राशीच्या लोकांची गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील.इतकंच काय तर हात लावाल त्या कामात यश अशी स्थिती असेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. आरोग्य उत्तम राहील.

6 / 7
तूळ राशीच्या जातकांसाठी गुरू आणि मंगळामुळे तयार होणारा अर्धकेंद्र योग देखील फायदेशीर ठरू शकतो. या काळात प्रवासाचा योग जुळून येईल. कामानिमित्त मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. त्याचा तुम्हाला व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनही चांगलं राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.

7 / 7
कुंभ राशीच्या जातकांसाठी अर्धकेंद्र योग अतिशय अनुकूल ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. करिअरच्या क्षेत्रात चांगली संधी मिळू शकते. नोकरीत बदल होण्याचीही शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)