Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 5 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आर्थिक गणित आज सुटलेलं दिसेल. सध्या तुमच्याकडे पैशांचा आज आवक असेल. पैशांची उधळपट्टी टाळा. नातेसंबंध जपण्यावर जोर द्या. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी असेल.
3 / 10
यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तुम्ही सतर्क आणि जागरूक राहा. गाडी सावकाशपणे चालवा.शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.
4 / 10
तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही भावनिक पातळीवर निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवनात काही कलह होऊ शकतो. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. कारण यामुळे तुम्हाला नाहक त्रास होऊ शकतो. वाणीवर नियंत्रण ठेवा आणि शब्द जपून वापरा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
6 / 10
आजचा दिवस धकाधकीचा राहील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. संपूर्ण दिवसभर कामाचा ताण राहील. पण कामावर लक्ष केंद्रीत करून पूर्णत्वास न्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
करिअरमध्ये नवं काही करण्याची संधी मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. चांगल्या वेळेचा उपयोग करा आणि कामं पटापट आटपा. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.
8 / 10
मित्रांसोबत आजचा दिवस मजेत जाईल. काही गोष्टी नव्याने कळतील. मात्र त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल. तसेच भविष्यात सावधपणे पावलं उचला. शुभ अंक 1 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
9 / 10
आज आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. काही वाटत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कौटुंबिक वातावरण काही गोष्टी त्रासदायक ठरतील. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.
10 / 10
समाजात वावरणं फायद्याचं ठरतं. कारण यामुळे तुम्हाला एक वेगळी ओळख मिळते. तसेच मानसन्मान वाढते. आपल्या ओळखीचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)