अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. काही लाभदायी योजना आखाल. प्रेमप्रकरणात अपेक्षित यश मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग जांभळा राहील.
नोकरी करणाऱ्या जातकांना काही त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. सहकाऱ्यांच्या चुका तुम्हाला भोगाव्या लागू शकतात. नातेवाईकांकडून बदनामी होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
आज काही कठीण समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. काही गोष्टी निरअर्थक वाटत असतील. पण त्याचाच फटका बसू शकतो. त्यामुळे काळजी घ्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पिवळा राहील.
कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण राहील. काही चांगल्या घडामोडी घडतील. तसेच कामंही झटपट आटोपतील. नोकरीत पदोन्नती मिळेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील.
आजचा दिवस एकदम मरगळ असलेला राहील. काही मोठं करण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. जवळच्या व्यक्तींची हवी तशी साथ मिळणार नाही. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
आज जीवनात काही चांगल्या गोष्टींची अनुभूती मिळेल. हा अनुभव कायमस्वरूपी लक्षात राहील. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. देवदर्शनाचा योग जुळून येईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पांढरा राहील.
नोकरी करणाऱ्या जातकांना काही सकारात्मक घडामोडी घडताना दिसतील. कमी मेहनत घेऊनही अपेक्षित यश मिळेल. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग निळा राहील.
आज काही चांगली बातमी कानावर पडू शकते. कदाचित तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसणार नाही. दोन चार मित्रांना फोन केल्यानंतर खात्री पटेल. भविष्याची चिंता सोडून द्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग केसरी राहील.
न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डोक्यावर असलेलं ओझं रिकामी होईल. कामानिमित्त नव्या लोकांच्या गाठीभेटी होतील. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)