Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 16 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. नातेवाईकांना तुमच्या प्रगतीमुळे पोटदुखी होईल. उच्च शिक्षणाचा निर्णय घेण्यासाठी हा दिवस योग्य आहे. शुभ अंक 8 आणि शुभ रंग नारंगी राहील.
3 / 10
नोकरी करणाऱ्या जातकांना आज अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायिकांना मात्र यामुळे फायदा होऊ शकतो. दिवसभर कसलीतरी चिंता लागून राहील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.
4 / 10
आज एखाद्या खास व्यक्तीशी संपर्क होऊ शकतो. त्या व्यक्तीमुळे फायदा होईल. दुसरीकडे कौटुंबिक वादामुळे डोकं भनभनून जाईल. जवळच्या व्यक्तीकडून दगाफटका होऊ शकतो. शुभ अंक 26 आणि शुभ रंग पांढरा राहील.
5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. जास्त भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. गाडी चालवताना काळजी घ्या. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.
6 / 10
पगारवाढ किंवा पदोन्नती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंब आणि मित्रांसोबत आनंद शेअर कराल. पण कामाच्या ठिकाणी अतिरिक्त भार पडल्याने डोकेदुखी वाढू शकते. काही योजना बारगळू शकतात. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
7 / 10
आज आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याची वेळ आहे. काही गोष्टींमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. पण नाती टिकवण्यासाठी त्यावर पाणी सोडलेलं बरं राहील. कोणताही निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
8 / 10
आजच्या दिवशी पैशांची चणचण भासू शकते. कामातही हवं तसं मन लागणार नाही. एखाद्या किचकट कामामुळे डोकेदुखी वाढेल. विनाकारण चिडचिड होईल. घरीही वातावरण तणावपूर्ण राहील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
9 / 10
काही वाद अंगाशी येतील. त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखं वाटेल. पण काळजी सोडून कामावर लक्ष केंद्रीत करा. गरज नसताना मोठी जोखिम पत्कारू नका. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
10 / 10
शत्रूपक्षाकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण वाद घालण्यापेक्षा शांत राहण्याचा प्रयत्न करा. या काळात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होईल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)