Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 22 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
प्रत्येक दिवस आपलाच असतो असं नाही. कधी आपल्याला एक पाऊल मागे यावं लागतं. असाच आजचा दिवस असेल. एक पाऊल मागे घेतल्याने काही कमी होत नाही. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.
3 / 10
गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत असलेल्या कामात यश मिळेल. कायदेशीर प्रकरणातही निकाल आपल्या बाजूने लागेल. विनाकारण एखाद्या गोष्टीची चिंता सोडा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पांढरा राहील.
4 / 10
कौटुंबिक स्तरावर आनंदाचं वातावरण राहील. त्यामुळे उगाच वाद होईल असं वागू नका. आपण कुटुंबासोबत आनंद लुटल्याने आत्मविश्वास दुणावेल. शुभ अंक 24 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
5 / 10
भविष्याच्या दृष्टीकोनातून काही योजना आखणं गरजेचं आहे. पण अधिक आर्थिक जोखिम घेऊन चालणार नाही. नाही तर हातचंही सर्व जाईल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग लाल राहील.
6 / 10
दिवसाची सुरुवात चांगली झाली दिवस चांगला जातो. त्यामुळे सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा. कुटुंबासाठी वेळ काढा आणि त्यांना काय हवं नको याची विचारपूस करा. शुभ अंक 5 आणि शुभ हिरवा राहील.
7 / 10
आजचा दिवस संमिश्र राहील. काही चांगल्या गोष्टी घडतील. तर काही गोष्टींमध्ये निराशा हाती पडेल. त्यामुळे आपण काम करत राहावं. जे काही होईल त्याची चिंता सोडावी. शुभ अंक 21 आणि शुभ रंग हिरवा राहील.
8 / 10
आजचा दिवस काळजी घ्यावी लागेल. काही अक्रित घटना घडू शकतात. लांबचा प्रवास करायचा असेल तर काळजी घ्या. सामनाची देखभाल योग्य रितीने करा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
9 / 10
कौटुंबिक स्तरावर काही घडामोडी घडतील. वडिलधाऱ्या व्यक्तींनी घेतलेल्याा निर्णयामुळे हस्तक्षेप करता येणार नाही. पण गरज पडेल तेव्हा योग्य तो सल्ला द्या. शुभ अंक 20 आणि शुभ रंग जांभळा राहील.
10 / 10
आजच्या कामाच्या नको तो ताण डोक्यावर असेल. उगाचच एखाद्या गोष्टीला होकार दिला असं वाटेल. विनाकारण मोठा आर्थिक फटका बसू शकतो. शुभ अंक 15 आणि शुभ रंग जांभळा राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)