Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 30 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jun 29, 2023 | 8:55 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
घर किंवा जागा घेण्यासाठी आजचा दिवस चांगला ठरेल. नव्या योजनांवर तुम्ही काम करू शकता. आत्मविश्वास दुणावलेला राहील. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

3 / 10
कोणत्याही कामासाठी योग्य वेळ देणं गरजेचं आहे. कारण एखादं काम पूर्णत्वास देण्यास चिकाटी लागते. जुन्या ओळखींचा तुम्हाला फायदा होईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
कामाच्या तणातून थोडा ब्रेक घेणं गरजेचं आहे. आराम करून तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि त्यांच्या समस्या जाणून घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल आहे.

5 / 10
अध्यात्मिक प्रगतीसाठी आजचा दिवस चांगला ठरेल. ध्यान धारणा करून मन शांतीसाठी प्रयत्न करा. मुलांना वेळ द्या आणि त्यांचा अभ्यास घ्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहा.

6 / 10
आरोग्यविषयक तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. मित्रांसोबत आपले विचार मांडा आणि त्यावर अमलबजावणी करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

7 / 10
वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. कोणताही निर्णय आतातायीपणे घेऊ नका. सोशल मीडियापासून दूर राहिलेलं बरं राहील. पोस्ट टाकताना वाद होईल असं काही करू नका. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

8 / 10
नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील. करिअर व्यतिरिक्त कामाचा अनुभव गाठिशी पडेल. त्यामुळे नक्कीच भविष्यात फायदा होईल. भविष्यात करिअर निवडण्यासाठी हीच वेळ योग्य ठरेल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
प्रामाणिकपणे काम करण्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पुरस्कार किंवा वेतनवाढ होऊ शकते. समाजात तुमच्या कामाचं कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

10 / 10
लांबचा प्रवास करणं टाळा. गरज पडल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेचे सर्व नियम पाळा. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)