Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 18 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
समाजात मानसन्मान मिळेल. पण आपल्या वैयक्तिक कामाकडे दुर्लक्ष करू नका. कारण खोट्या प्रतिष्ठेत राहण्यात काहीच अर्थ नाही. आपल्या कुटुंबियांना वेळ द्या. शुभ अंक 22 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
आर्थिक स्थिती थोडी खालावलेली राहील. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबाची उत्तम साथ लाभेल. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. शुभ अंक 5 आणि शुभ रंग पिवळा राहील.
4 / 10
करिअरमध्ये प्रगतीची नवी उंची गाठाल. पण हा प्रवास करताना काही अडचणींचा सामना करावा लागेल हे विसरू नका. आपल्यातील क्षमता ओळखा आणि काम करा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
5 / 10
आपलं उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. मार्केटिंगचं काम करणाऱ्या जातकांना फायदा होईल. नवी ग्राहक आकर्षित होतील आणि चांगला लाभ मिळेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
6 / 10
आजचा दिवस मस्त आनंदात जाईल. ठरवल्याप्रमाणे काही कामं होतील. पण रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. रागाच्या भरात कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका. शुभ अंक 7 आणि शुभ रंग जांभळा राहील.
7 / 10
नवीन लोकांच्या आज भेटीगाठी होतील. त्यामुळे काही कामं मार्गी लागतील. उगाचचं अतिरिक्त आश्वासनं देऊ नका. करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
8 / 10
आपल्या भविष्यातील योजना योग्य रितीने पार पाडा. येणारी वेळ चांगली आहे. त्यामुळे त्याचा योग्य तो फायदा करून घ्या. बचतीकडे लक्ष द्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
9 / 10
गुप्त शत्रूंकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. आपल्या हातून चूक होणार नाही यासाठी दक्ष राहा. एखादी चूक महागात पडू शकते. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
वैयक्तिक स्वार्थासाठी कोणाला दु:ख देऊ नका. कामावर लक्ष केंद्रीत करा. कौटुंबिक स्तरावर काही कारणास्तव वाद होऊ शकतात. पण हा वाद सामंजस्यपणे सोडवा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)