अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
आजचा दिवस आनंदात जाईल आणि आपल्या कामामुळे इतरांवर प्रभाव पडेल. पार्टनरशिपच्या धंद्यात चांगली कमाई होईल. गरीब आणि गरजू व्यक्तींची मदत करा. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
तुमच्या सामाजिक कार्याचं कौतुक होईल. न्यायालयीन प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. मित्रांसोबत वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 22 आणि शुभ रंग करडा राहील.
आपलं आवडतं काम करण्यासाठी आजचा दिवस एकदम मस्त असेल. दुसऱ्यांचा विचार करून कामं हाती घेऊ नका. आर्थिक फटका बसू शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
दिवसभरात चांगली कमाई हाती पडेल. मनासारखं काम हाती लागल्याने आनंदी व्हाल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. काही नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
आपण कसे वागतो याकडे एकदा लक्ष द्या. कारण आपला स्वभाव कधी कधी आपल्या प्रगतीत अडथळा ठरतो. शत्रूपक्षाकडून त्रास होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
दिवसभर कामाचा पसारा डोक्यावर असेल. उद्योग धंद्यात मार्केटिंक करण्याकडेही लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. जमिन किंवा वाहन खरेदीचा योग आहे. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
कार्यक्रमात नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. दूरच्या नातेवाईकांकडून काही आठवणींना उजाळा मिळेल. नव्या ओळखींमुळे उद्योगधंद्यात फायदा होईल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
आजच्या दिवसाची सुरुवात तोंड गोड करून करा. आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. अनोळखी लोकांशी पैशांचा व्यवहार करू नका. फटका बसू शकतो. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
गेल्या काही दिवसात केलेल्या कामाचं फळ मिळेल. तुमची नवीन ओळख निर्माण होईल. करिअरमध्ये नवी उंची गाठाल. देवदर्शनाचा योग आहे. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लेमन राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)