Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 2 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आज तुमचं काम व्यवस्थितरित्या करा. कारण तुमच्या कामावर बारीक नजर असणार आहे. काही ठिकाणी तुमचं मनोबल ढासळू शकते. व्यवसायात नुकसान होऊ शकतं. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.
3 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. काही आर्थिक गणित मित्रांच्या मदतीमुळे सुटतील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
4 / 10
आजचा नवीन योजना राबवण्यासाठी चांगला राहील. घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करा. त्याला दु:ख होईल असं वागू नका. धार्मिक कार्यक्रम किंवा उत्सवात हिरिरीने भाग घ्याल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. अडकलेले पैसे मिळू शकतात. नव्याने उधारी देण्याच्या भानगडीत पडू नका. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आजच्या दिवसात काही सकारात्मक घडामोडी घडतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. पत्नीच्या भावनांचा आदर राखा. उगाच त्रागा करू नका. खाण्यापिण्याच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.
7 / 10
आज काही अनपेक्षित घडामोडी घडतील. ज्या लोकांनी तुमच्याकडे पाठ फिरवली होती. असे लोक तुमच्या जवळ येऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. प्रेम प्रकरणात यश मिळू शकते. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
आजचा दिवस नोकरी करणाऱ्या जातकांनाचा आहे. काही चुका ज्या अंगलट आल्या होत्या त्याचं निकारण होईल. बॉसकडून समज दिली जाईल. डोक्यावरचा टेन्शन दूर झाल्याने दिवस मस्त जाईल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.
9 / 10
आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्या बोलण्याने बरीच गणितं बिघडतील. नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं. पण कौटुंबिक स्तरावर पत्नी आणि मुलांची उत्तम साथ मिळेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
आजचा दिवस आराम करणंच योग्य राहील. धार्मिक विधी पार पाडण्यासाठी उत्तम दिवस आहे. आपले छंद जोपासा. तसेच मुलांना काही नवीन शिकवण्याच्या हेतूने प्रयत्न करा. पत्नीला एखादी वस्तू गिफ्ट द्या. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)