Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 28 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येक अंकावर ग्रहांचा वर्चस्व असतं. त्यामुळे ग्रह आणि अंकाच्या गणितानुसार तुमचा दिवस कसा जाईल? अंकाचं गणित शनिवार 28 ऑक्टोबर रोजी कसं असेल? याबाबत जाणून घेऊयात.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
नोकरीत चांगलं प्रदर्शन करणारा दिवस आहे. धीर ठेवा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. वाद होईल अस वागू नका. आरोग्य विषयक तक्रारी दूर होतील. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
आज जो काही निकाल लागेल ते स्वीकारा. नकारात्मक विचार दूर करा आणि आत्मविश्वासाने कामाला लागा. आई वडिलांकडून चांगली साथ मिळेल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
4 / 10
आज नकारात्मक ऊर्जा अवतीभोवती वावरत असल्याचा भास होईल. पण कठीण प्रसंगावर मात करण्याची तयारी ठेवा. मन शांत ठेवा आणि नामस्मरण करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
आर्थिक गणित सुटतील. बचतीकडे लक्ष केंद्रीत करा. कारण भविष्यात तुम्हाला याचा फायदा होईल. मित्रमंडळीकडून मदत मिळेल. भावंडांकडून शुभ बातमी मिळेल.शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
6 / 10
काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी तयारी ठेवा. कोणी दुखावलं तरी आपण चांगल्यासाठी असं करत आहोत हे लक्षात ठेवा. संध्याकाळपर्यंत दिलासादायक चित्र राहील. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी दूर होतील. कमी कामातच चांगला निकाल मिळेल. दूरचा प्रवास करणं टाळा. तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
झोप पूर्ण न झाल्याने दिवसाची सुरुवात आळसावलेली राहील. सुस्तीमुळे कामात मन रमणार नाही. प्राणायाम करा. सकारात्मक उर्जेसाठी प्रयत्न करा. देवदर्शन घ्या. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
मित्रांच्या भेटीगाठी होतील. करिअरमध्ये नव्या संधी चालून येतील. आयात निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती दिसेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
कुटुंबाकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. सामाजिक स्तरावर चांगली प्रगती कराल. आत्मविश्वासासह मानसन्मान मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)