Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 29 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
कोणतीही गोष्ट बोलताना काळजी घ्या. आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ तर काढला जात नाही ना याबाबत विचार करा. आपल्या समस्या प्रिय व्यक्तींसोबत शेअर करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
काही कारणास्तव प्रवास करण्याचा वेळ येईल. पण कामासाठी आळस झटकून जावंच लागेल. आर्थिक नियोजन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
4 / 10
काही क्षण हे आयुष्यभरासाठी असतात. त्याच्या आठवणींना आपला ऊर भरून येतो. त्यामुळे असे क्षण घालवू नका. त्याचा आनंद घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
घरातील प्रत्येक गोष्टींकडे बारकाईने नजर टाका. काही तुटक्या फुटक्या वस्तू असतील तर त्या फेकून द्या. नकारात्मक ऊर्जेला थारा देऊ नका. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
6 / 10
काही गोष्टींचा गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही विचार करत असाल. त्या गोष्टी मिळाल्याने आनंद द्विगुणित होईल. आतातायीपणा करू नका. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.
7 / 10
जवळच्या व्यक्तींचा सल्ला घ्या आणि कामाला सुरुवात करा. कारण प्रत्येक गोष्ट आपण ठरवू तशीच होत नाही. कधीतरी कमीपणा घ्यावा लागतो. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
8 / 10
प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण असतात. त्यामुळे आपल्यातही काही चांगले गुण आहेत हे लक्षात ठेवा. त्याचं परीक्षण करा आणि कामाला लागा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.
9 / 10
नवीन काम हाती घ्या आणि ते पूर्णत्वास न्याल. त्यामुळे शत्रूपक्षाकडून कुरघोड्या सुरु होतील. पण त्यांना भीक घालू नका आणि काम करतच राहा. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.
10 / 10
काही प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत हे लक्षात ठेवा. त्यामुळे शांत डोकं ठेवा आणि पुढचा विचार करा. भुतकाळात रमण्यात काहीच अर्थ नाही. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)