Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 30 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आज तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्हाला मानसन्मान मिळेल. तुमचे अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतात. नोकरी शोधणाऱ्यांना अपेक्षित कॉल येऊ शकतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासात कठोर परिश्रम केले पाहिजेत. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
झोपेच्या कमतरतेमुळे आज तुम्हाला दिवस आळसावलेला वाटेल. कामात हवं तसं लक्षच लागणार नाही. संध्याकाळच्या सत्रात उत्साह वाटेल. देवदर्शन घ्या. तसेच लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
4 / 10
आज तुम्ही घाईघाईत बरीच कामं उरकावी लागतील. कामाचा ढीग पाहून अस्वस्थ वाटेल. वाहन चालवताना काळजी घ्या. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने तुम्ही गुंतागुंतीच्या परिस्थितीतून बाहेर पडू शकाल. शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळू शकते. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
कामात चालढकलपणा अंगाशी येऊ शकतो. कामं आटपा नाही तर ढीग तयार होईल. तुमच्या नेटवर्कच्या मदतीने कामं पू्ण करा. मित्रांसोबत फिरण्याची एखादी योजना आखा. मित्रांशी असलेले वाद मिटवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
6 / 10
गरज नसलेल्या गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळा. तसेच नातेवाईक आणि इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, अन्यथा पदरी निराशा पडू शकते. घरातील वादात उगीचच वाद निर्माण होईल असं वागू नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
आज उत्साही आणि आत्मविश्वास दुणावलेला दिसून येईलल. तुमचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करा.तसेच इतरांना मदत करू शकता. तुमचे काम आणि वैयक्तिक जीवन यात चांगला समतोल ठेवा. आयात-निर्यात, व्यापार संबंधित लोक यशस्वी होऊ शकतात. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
काम केल्याशिवाय हाती काहीच पडणार आहे. त्यामुळे झटपट पैसे मिळवण्याचे स्वप्न सोडून द्या. नुसती स्वप्न पाहून यश मिळत नाही. प्रत्यक्ष कृती करणं गरजेचं आहे. आर्थिक अडचणी तुमच्या प्रकल्पांवर परिणाम करू शकतात. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कमी कष्टात अधिकचं यश मिळवाल. कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण राहील. कायदेशीर प्रकरणात तुम्हाला यश मिळू शकते. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
आज कमी प्रयत्न करूनही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला तुमच्या मागील गुंतवणुकीतून नफा मिळेल. तुमच्या मेहनतीचे इच्छित फळ मिळू शकते. समाजात मानसन्मान वाढेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)