Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 10 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आर्थिक चणचण भासवणारा हा दिवस आहे. काही गरजेच्या वस्तूंसाठी जमा केलेली रक्कम भलत्याच कामासाठी खर्च करावी लागेल. त्यामुळे मन खात राहील. पण आता पुढे जाणंही गरजेचं आहे. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
आज आपल्या मित्रांकडून काही महत्त्वाचा सल्ला मिळेल. त्यामुळे काही अडचणी दूर होतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्यास फटका बसू शकतो. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
4 / 10
कधी कधी काहीही न करता आपल्या पदरात चांगलं फळ पडतं. याची अनुभूती आज तुम्हाला येईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. पण मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
समाजात मानसन्मान वाढेल. त्यामुळे स्वभावात फरक पडेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की शब्द जपून वापरणं गरजेचं आहे. चांगल्या कामाची चांगली फळं मिळतात. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रिम राहील.
6 / 10
आर्थिक व्यवहार करताना कधीही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण मोठा आर्थिक फटका परवडणारा नाही. त्यामुळे पुढच्या काही वर्षांवर परिणाम होईल. तसेच नियोजन विस्कटून जाई. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
जीवनात पुढे जाण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. आपली स्वप्नपूर्ती करण्यासाठी दुसऱ्यांना खाली खेचणं योग्य नाही. त्याऐवजी प्रामाणिक प्रयत्न करा. निश्चित फायदा होईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
मागच्या काही गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. पण त्यातूनही काही गुंतवणूक केली तर फायद्याची ठरू शकते. पैशांची सध्या काही गरज नसल्यास गुंतवणूक करा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
नातेवाईकांशी काही कारणास्तव वाद होऊ शकतो. पण वादातून काहीच निष्पन्न होणार नाही. जागेसंदर्भातील वाद कोर्टात गेल्याने पैसा अधिक खर्च होईल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
आजचा दिवस तुमचाच आहे असं समजा. काही किचकट कामं पूर्ण होतील. तसेच काही व्यवहारातून सकारात्मक परिणाम दिसून येतील. प्रयत्न करणं सोडू नका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)