Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 13 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
शत्रूपक्षाकडून त्रास होण्याची शक्यता आहे. उगाचच भांडणाचं कारण ठरेल. त्यामुळे दिवसभर मानसिक स्थिती बिघडलेली राहील. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.
3 / 10
कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. तब्येतीची काळजी घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. बचतीकडे लक्ष द्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
4 / 10
त्याच त्याच गोष्टी करून कंटाळा आला असेल काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच नवी आर्थिक स्रोत निर्माण होतील. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील.
5 / 10
आर्थिक नुकसान होईल असा व्यवहार करू नका. भविष्याच्या दृष्टीकोनातून पावलं उचला. कायदेशीर प्रकरणातून दूर राहिलेलंच बरं राहील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
6 / 10
आपण काय करतो याचं आकलन करा. चुकीच्या गोष्टींचं समर्थन करू नका अन्यथा भविष्यात फटका बसू शकतो. वाहन हळू चालवा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.
7 / 10
आपल्या आई वडिलांसोबत विनाकारण भांडू नका. ते काय सांगतात ते समजून घ्या. आपल्या फायद्याचाच ते विचार करत असतील. त्यामुळे विचार करा आणि पावलं उचला. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
8 / 10
कोणतंही काम करण्यासाठी मेहनीतीची आवश्यकता असते. त्यामुळे आळस झटका आणि कामाला लागा. उगचच उंटावरून शेळ्या हाकू नका. शुभ अंक 8 आणि शुभ रंग लाल राहील.
9 / 10
वाहन चालवताना काळजी घ्या. शक्यतो लांबचा प्रवास करणं टाळा. गरज पडल्यास सार्वजनिक वाहनातून प्रवास करा. कुटुंबासोबत वेळ व्यतित करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
10 / 10
नशिबाची आज चांगली साथ मिळेल. त्यामुळे जे काम हाती घ्याल ते मन लावून पूर्ण करा. तसेच प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)