Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 18 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
भौतिक सुखांचा अनुभव घेण्याचा दिवस आहे. कारण काम करत असताना काही सुखं अनुभवणं देखील गरजेचं आहे. मित्र आणि नातेवाईकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी असेल.
3 / 10
काही गोष्टी बुद्धीच्या जोरावर पूर्ण कराव्या लागतात. प्रत्येकवेळी ताकद कामी येतेच असं नाही. गरज पडल्यास वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. विचार करूनच एखादा शब्द द्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी असेल.
4 / 10
नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना चांगली ऑफर मिळू शकते. मात्र जरासी दिरंगाई तुम्हाला महागात पडू शकते हेही तितकंच खरं आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा असेल.
5 / 10
वडिलधाऱ्या माणसांचा सल्ला कधी कधी खूपच कामी येतो. अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. आरोग्य विषयक तक्रारी जाणवतील. कदाचित डॉक्टरकडे जाण्याची वेळ येईल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा असेल.
6 / 10
आजचा दिवशी तुमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. मित्र आणि कुटुंबाची चांगली साथ मिळेल. कामाच्या ठिकाणीही आनंदी वातावरण राहील. तुमच्या वागण्याने अनेक जण आकर्षित होतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.
7 / 10
काही घडामोडी अशा घडतात की त्यामुळे आत्मविश्वास चांगलाच वाढतो. असाच आजचा दिवस आहे. पण वास्तवापेक्षा वेगळं काही करण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर फटका बसू शकतो. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
आर्थिक गणित आज सुटलेलं दिसेल. सध्या तुमच्याकडे पैशांचा आज आवक असेल. पैशांची उधळपट्टी टाळा. नातेसंबंध जपण्यावर जोर द्या. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा राहील.
9 / 10
कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. कारण यामुळे तुम्हाला नाहक त्रास होऊ शकतो. वाणीवर नियंत्रण ठेवा आणि शब्द जपून वापरा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
करिअरमध्ये नवं काही करण्याची संधी मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. चांगल्या वेळेचा उपयोग करा आणि कामं पटापट आटपा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)