Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 20 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आर्थिकदृष्ट्या सर्व काही ठीक राहील पण मानसिक शांतता लाभणार नाही. तुमच्या बोलण्याचा इतरांना त्रास होऊ शकतो. शुभचिंतकांकडून काही चांगल्या घडामोडी घडतील.कोणत्याही समस्यांची जास्त काळजी करण्याची गरज नाही. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.
3 / 10
आजचा दिवस तुम्ही स्वतः दबाव असणार आहात. रोजगाराच्या संधी खुल्या होऊ शकतात.तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी दुसऱ्यांना त्रास देऊ नका. मुलाच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
4 / 10
दुसऱ्याच्या सांगण्यावरून जोखिम पत्कारू नका. तुमचे मत मांडण्यासाठी काही अडथळे येऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी योग्य दिवस आहे. उत्पन्नाच्या स्रोताबाबत मतभेद होऊ शकतात. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
तुमच्या सामाजिक कार्यात अडचणी येऊ शकतात. आरोग्याचा प्रश्नही डोकं वर काढेल. उत्पन्न चांगलं असलं तरी शारीरिक श्रम मात्र वाढतील. तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर तुमच्यावर दबाव जास्त असेल. मालमत्ता मिळविण्यासाठी तुम्ही जास्त पैसे खर्च करावे लागतील. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
नोकरदारांप्रती तुमची नाराजी दिसून येईल.तुमच्या कामासाठी तुम्ही कोणाला तरी नियुक्त करण्याची वेळ येईल. जोडीदाराच्या वागणुकीबद्दल तुम्हाला अधिक वाईट वाटेल. आज पैशाच्या बाबतीत गणित बिघडू शकते. तुम्ही धार्मिक कार्यात थोडे व्यस्त व्हाल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.
7 / 10
तुमच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणून तुम्हाला वाईट वाटेल. मित्रही ऐनवेळी पाठ फिरवतील. सहकाऱ्यांच्या सहवासातून तुम्हाला वाईट सवयी लागण्याची शक्यता आहे. अभ्यासात एकाग्रता कमी राहील.वडीलांशी भांडण होऊ शकतं. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
स्वयंरोजगार असलेल्या लोकांना अपेक्षित नफा मिळवणं कठीण जाईल. इतर लोक तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील आणि तुमची थट्टा केली जाईल.वडिलोपार्जित मालमत्ता तुमच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.
9 / 10
कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही तुमचे काम हळू हळू कराल. शुभ समारंभासाठी भेट देण्याचे प्रसंग येऊ शकतात. तुम्ही तुमच्या काही कल्पना इतरांवर लादू नका. एखादी मौल्यवान वस्तू गायब होऊ शकते. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
पैशाच्या बाबतीत तुमचा शब्द पाळणे तुम्हाला कठीण जाईल. तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होतील.अत्यावश्यक कामामुळे प्रवास करावा लागेल. तुम्ही जे बोललात ते खरे असले तरी त्यावर लगेच विश्वास ठेवणे कठीण आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)