Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 8 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
कालच्या तुलनेत आजचा दिवस बरा असेल. तुम्ही संयम आणि एकाग्र राहाल. विद्यार्थी ध्येयावर लक्ष केंद्रित करतील.अविवाहित लोकांना चांगली स्थळं चालून येतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग नारंगी राहील.
3 / 10
आज तुम्हाला उदास आणि अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे मनःस्थितीत बदल होऊ शकतो. त्याचा तुमच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. आज बेदरकारपणे वाहन चालवणे टाळा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग काळा राहील.
4 / 10
आज तुम्ही आनंदी राहाल. तसेच कामं झटपट आटपतील. जोडीदारासोबत असलेले वाद संपुष्टात येतील. आज तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. शुभ अंक 2 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
तुम्ही कामात धीर धरा आणि हाती घेतलेलं काम पूर्ण करा. आज चांगली कामगिरी कराल. कौटुंबिक आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली नोकरी मिळू शकते. शुभ अंक 17 आणि शुभ रंग हिरवा राहील.
6 / 10
आज तुम्ही गरजू लोकांना मदत करू शकता. सकारात्मक परिणाम तुम्हाला आनंदित करतील. व्यावहारिक व्हा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबासोबत आजचा दिवस व्यतित करा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
7 / 10
आज तुम्ही असमाधानी आणि अडचणींचा डोंगर उभा राहील. तुम्हाला तुमची कामं वेळेवर पूर्ण करणे कठीण होऊ शकते. आई-वडिलांची काळजी घ्या. तुमचा प्रवास काही दिवस पुढे ढकला. शुभ अंक 4 आणि शुभ रंग लाल राहील.
8 / 10
भविष्यात फायदेशीर ठरणारा नवीन प्रकल्प सुरू करू शकता. तुम्हाला भावंडं मदत करू शकतात. कौटुंबिक कारणांमुळे गावी जावं लागू शकते. नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी येतील. शुभ 17 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
9 / 10
आज तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. अकारण गोष्टींवर पैसा खर्च करू नका. आणि पैसे वाचवू शकाल.विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाबाबत चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. शुभ अंक 3 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
10 / 10
आज मानसिक शांती मिळेल. तुम्हाला कामाशी संबंधित तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. तुमची बचत वाढेल. शुभ अंक 1 आणि शुभ रंग लाल राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)