Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 9 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. जीवनात परिवर्तन पाहायला मिळेल. आई वडील आणि मित्रांची साथ मिळेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
काही नाती आपल्या प्रगतीत अडथळा ठरत असतात. त्यामुळे नकारात्मकता दूर सारून कामाला लागा. बोलणारा बोलत राहील आपण आपलं काम करत राहिलं पाहीजे. शुभ अंक 21 आणि शुभ रंग निळा राहील.
4 / 10
कोणताही निर्णय घेताना त्याचे दूरगामी परिणाम काय असतील याची जाण ठेवा. आपल्यामुळे कोण दुखावणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 17 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
उत्पन्न आणि खर्च याची सांगड घालणं खूप महत्त्वाचं आहे. उत्पन्नापेक्षा जास्त पैसा खर्च होत असेल. तर डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहू शकतो. शुभ अंक 19 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
मेहनतीशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. काही कामांसाठी तुमची निवड केली जाईल. तुमची योग्यता पाहूनच ही जबाबदारी दिली जाईल हे लक्षात ठेवा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग नारंगी राहील.
7 / 10
खरं कधीही लपवलं जाऊ शकत नाही. हे बाब कायम लक्षात ठेवा. आज तुम्हाला फटका बसेल पण भविष्यात तुम्हाला याचा फायदा होईल. कुटुंबासोबत वेळ व्यतित करा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवत असते. काल परवापर्यंत आपल्या हाती सर्व होतं तेव्हा मान होता. मात्र नोकरी हातातून गेल्यावर सर्वच पाठ फिरवतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.
9 / 10
जीवनात यश प्राप्त करायचं असेल तर सातत्य खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रयत्न सोडू नका. विजयाकडे पाऊल टाकत राहा. आत्मविश्वास वाढला की सर्वकाही ठिक होईल. शुभ अंक 1 आणि शुभ रंग आकाशी राहील.
10 / 10
आज काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही गोष्टी जुळून न आल्याने डोक्याला ताप होईल. आपल्या हातून काही चूक झाली असं वारंवार वाटेल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)