अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
आवडती वस्तू आज खरेदी करण्याच योग जुळून येईल. त्यामुळे पत्नी खूश असेल. बाहेरचं खाणं टाळा आणि आरोग्याकडे लक्ष द्या. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
कायदेशीर प्रकरणामुळे पुरते हैराण होऊ जाल. नातेवाईकांकडून नाहक त्रास दिला जाईल. त्यामुळे घरात तणावाचं वातावरण राहील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
गुप्तशत्रूंकडून तुमच्या विरोधात कारवाया होतील. त्यामुळे दगाफटका नेमका कुठे झाला असा प्रश्न पडेल. मात्र त्यांना आपल्या कामातून चोख उत्तर द्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
कोणती कामं महत्त्वाची आहेत याकडे लक्ष द्या. त्याप्रमाणे प्लानिंग करून एक एक काम मार्गी लावा. एक ना धड भाराभर चिंध्या असं करू नका. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
नवीन गोष्टी शिकायला मिळतील. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. नवे आर्थिक स्रोत निर्माण होतील. तसेच पैसा खेळता राहील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.
कोणत्यातरी गोष्टीची नाहक भीती वाटत राहील. पण ज्या गोष्टी घडलेल्याच नाहीत त्याबाबत उगाचच विचार करून चालणार नाही. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
पुढे जाण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. योग्य वाटल्यास जोखिम पत्कारून काम करा. फायदा होऊ शकतो. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.
काहीतर मिळावयचं असेल तर तितकी मेहनत करणं गरजेचं आहे. हातावर हात धरून कामं होत नाहीत. काही तरी करणं गरजेच आहे लक्षात ठेवा. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.
पत्नीसोबत काही कारणास्तव वाद होतील. पण टोकाला जाईल इतका वाद ताणू नका. शांत डोक्याने मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. मुलांवर वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)