Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 10 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आपलं अधिकारक्षेत्र पाहूनच काम करा. उगाचच वेगळ्या काही करण्याच्या भानगडीत पडू नका. नाही तर मोठा फटका बसू शकतो. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
पैसा विचारपूर्वक योग्य त्या ठिकाणी गुंतवा. अन्यथा भविष्यात मोठा फटका बसू शकतो. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
4 / 10
रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. प्रिय व्यक्तींना दुखवू नका. त्यांच्या भावनांचा आदर करा. तसेच काही आवश्यक गोष्टी घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
दिवसभर एकटेपणा जाणवेल. त्यामुळे आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करा. त्यामुळे गेल्या दिवसांपासून भंग पावलेली शांतता दूर होईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
6 / 10
काही गोष्टी करताना आपली आत्मविश्वासाची पारख होत असते. त्यामुळे एखादं काम हाती घेतलं की ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. टाळण्याचा प्रयत्न केला तर डोकेदुखी वाढेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
अहंकारामुळे व्यक्तीचं नुकसान होतं. याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्यामुळे अहंकार सोडून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
एखाद्या घटनेचा त्रास करून काही एक उपयोग होत नाही. आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढतील. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
नोकरीच्या ठिकाणी काही कारणास्तव वादाला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे डोकेदुखी वाढेल. त्यामुळे काही योजना आखा आणि त्यानुसार अंमलबजावणी करा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
आपण करत असलेल्या प्रत्येक कामात यश मिळेलच असं नाही. त्यामुळे निराश होऊ नका. नव्याने काम करण्यास सुरुवात करा. पत्नीसोबत प्रेमाने वागा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लेमन राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)