Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 15 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
मानसिक स्थिती आज बिघडलेली राहील. काही कारणास्तव मनस्ताप झाल्याने मन बैचेन असेल. चांगलं कार्य करा आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग निळा राहील.
3 / 10
आर्थिक गणित व्यवस्थित बसल्याने काही फायदे होतील. हव्या असलेल्या वस्तू वेळेत घेता येतील. आपली मेहनत कामी येईल. नवीन आर्थिक स्रोत निर्माण होतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
4 / 10
आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर काही कामं पूर्ण होतील. कुटुंबाची चांगली साथ मिळेल. जमिनीशी संबंधित व्यवहारामध्ये अडचणी येऊ शकता. प्रेमप्रकरणात अडचण येऊ शकते,. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा राहील.
5 / 10
आर्थिक उन्नती या काळात होऊ शकते. ऑफिसमध्ये सहकार्यांकडून मदतीचा हात मिळे. काही कामांमध्ये फटका बसू शकतो. चुकीच्या माहितीमुळे तुमचा गैरसमज वाढू शकतो. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
6 / 10
धार्मिक कार्यात मनापासून भाग घ्या. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि बचतीकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण गढूळ असल्याने मनस्ताप होईल. शुभ अंक 42 आणि शुभ रंग निळा असेल.
7 / 10
प्रेमप्रकरणात काही अंशी यश मिळेल. पण उतावळेपणामुळे हिरमोड होऊ शकतो. पार्टनरशिपच्या व्यवसायात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
8 / 10
विवाहित जीवनात काही अडचणींचा सामना करावा लागेल. जमिनीच्या वादात काही अडचणी डोकं वर काढतील. ऑफिसमधील फोनमुळे दैनंदिन जीवनात फरक पडेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 25 आणि शुभ रंग हिरवा राहील.
9 / 10
आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक दृष्टीने बऱ्याच घडामोडी घडतील. फायदा मिळवण्याच्या नादात मोठं नुकसान होऊ शकतं हे लक्षात ठेवा. महिलांसाठी आजचा दिवस शुभ राहील.शुभ अंक 3 आणि शुभ रंग केसरी राहील.
10 / 10
निर्णय घेण्यापूर्वी वडिलधआर्या व्यक्तींचा सल्ला घ्या. समाजात मानसन्मान वाढेल. आत्मविश्वासामुळे बरीच गणितं सुटतील. नवीन करार या काळात होणं शक्य आहे. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)