Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 28 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आज तुम्ही तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कामात चांगली कामगिरी करू शकता. तुमचे अडकलेले पैसे परत मिळवू शकता. तुम्ही विरोधक आणि शत्रूंवरही नियंत्रण ठेवू शकाल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.
3 / 10
जुन्या गुंतवणुकीतून परतावा चांगला मिळवू शकता. ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल टाकाल. काही गोष्टींची विनाकारण काळजी करून सोडा. नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
4 / 10
आज खर्चावर नियंत्रण ठेवा. पैसे उधार देणे टाळा आणि तुमच्या निर्णयात व्यावहारिक राहा. अति काळजीमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. तसेच जबाबदाऱ्यांपासून तुमचे लांब पळू नका. भावनिक निर्णय घेणे टाळा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
आज तुम्हाला नकारात्मक वातावरण जाणवेल. जवळचे लोक तुम्हाला साथ देणार नाहीत. गुंतवणूक टाळा आणि स्वतंत्र निर्णय घ्या. इतरांकडून मदतीची अपेक्षा करू नका, कारण यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आज तुम्हाला सुस्त आणि आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. त्यामुळे दिवसभर आळसावलेलं वाटेल. हाती घेतलेली कामंही पूर्ण होणार नाहीत. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.
7 / 10
आज तुम्हाला नातेवाईकांकडून उत्तम साथ मिळेल. समाजात मानसन्मान वाढेल. घराची दुरुस्ती करू शकता. त्याचबरबोर नवीन वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक करू शकता. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
आज तुमचा मूड चांगला राहील. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या दुखण्यातून आराम मिळेल. भविष्यासाठी योजना आखा. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसेल. प्रेम प्रकरणात विवाहाचा निर्णय घेऊ शकता. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.
9 / 10
आज तुम्ही जुन्या मित्रांना भेटू शकता. व्यवसायात प्रगती दिसून येईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून अनपेक्षित लाभ आणि चांगली बातमी देखील मिळू शकते. किचकट कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
भुतकाळातील गुंतवणुकीमुळे तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे कुटुंब तुम्हाला साथ देईल. तुम्हाला पदोन्नती मिळेल किंवा नोकरीत बदल करू शकता. तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवण्यात यशस्वी ठराल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)