Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 6 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या. जोडीदारासोबत काही कारणावरून वाद असतील तर ते शांतपणे सोडवा. मुलांच्या प्रश्नकडे लक्ष द्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
3 / 10
आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा राहील. इतरांकडून घेतलेले पैसे परत करा. तसेच आनंदाच्या भरात कोणतंही आश्वासन देऊ नका. शुभ अंक 11 आणि शुभ रंग नारंगी राहील.
4 / 10
शिक्षणातील काही अडचणी दूर करणारा हा दिवस राहील. मन लावून अभ्यास करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्ग सापडेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग निळा राहील.
5 / 10
आपल्या आयुष्यात इतरांकडून मदतीची आपण अपेक्षा करतो. तसेच इतरांना आपल्या मदतीची आवश्यकता असते. त्यांना योग्य ती मदत करा आणि अडचणीतून सोडवा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग निळा राहील.
6 / 10
गुप्त शत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसानही होऊ शकते. त्यामुळे खर्च करताना काळजी घ्या. दुसरीकडे आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक 7 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
साईड बिझनेस शोधत असाल तर आज तुम्हाला त्यासाठी मार्ग सापडू शकतो. पण वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. जोखिम पत्कारताना आर्थिक स्थिती पाहा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.
8 / 10
कामाच्या ठिकाणी आपल्याकडून चूक होणार नाही याची काळजी घ्या. कारण इतर लोकं तुमच्या चुका दाखवण्यासाठी धडपड करतील. वरिष्ठांशी वाद घालू नका. शुभ अंक 19 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
9 / 10
कौटुंबिक कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. जवळचा प्रवास करण्याचा योग जुळून येईल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.
10 / 10
काही नियोजित कामंही वेळेत होत नसल्याने अस्वस्थता वाढेल. पैसा अडकून राहिल्याने दिवसभर चलबिचल राहील. तसेच काही ठिकाणी विनाकारण पैसा खर्च करावा लागू शकतो. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)