Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 7 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे काळजी घ्या. आध्यात्मिक प्रगती होईल.वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
आजचा दिवस तुम्ही महत्त्वाची कामं पार पाडू शकता. प्रिय व्यक्तीसोबत जवळच्या प्रवासाचा योग जुळून येईल. आपल्या कामांना प्राधान्य द्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
4 / 10
आपल्या कामात प्रगती होताना दिसेल. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. जीवनाचा आनंद लुटा आणि जोखिम असलेली कामं सहज पूर्ण होतील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
नात्यांमध्ये काही कटू घटना घडतील. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. आपल्या कामाला प्राधान्य द्या. नवनवीन प्रयोग करू शकता. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
6 / 10
आज काही भौतिक सुखांची अनुभूती मिळेल. आपल्या कामामुळे एक वेगळी ओळख निर्माण होईल. समाजात मानसन्मान वाढेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.
7 / 10
आपले बॉस आणि घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींकडून प्रशंसा होईल. नवीन काही गोष्टी शिकाल. काही गोष्टी नव्याने सुरु करू शकता. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
8 / 10
आपण काही कारणास्तव भावुक व्हाल. कामाचा ताण राहील. वेळ मिळेल तसा आराम करा. नात्यातील दूरावा कमी करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.
9 / 10
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. तसेच निसर्गाच्या सान्निध्यात आल्याने आत्मिक शांती लाभेल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.
10 / 10
मित्रांकडून तुम्हाला काही चांगल्या गोष्टी कानावर पडतील. प्रेम प्रकरणात तुम्हाला यश मिळू शकते. कौटुंबिक स्तरावर आनंदी वातावरण राहील. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)