Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 8 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आर्थिक फटका बसल्याने निराशा पदरी पडेल. काही आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
आज एकदम आनंदी वातावरण राहील. सर्व काही मनासारखं झाल्याने आत्मविश्वास दुणावेल. समाजात मानसन्मान वाढेल. काल परवापर्यंत जे लोकं शिव्या घालत होते तेही स्तुती करतील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
4 / 10
आजच्या दिवसात एखादी मोठी योजना आखू शकता. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दहावेळा विचार करा. जोडीदाराकडून चांगली मदत होईल. कुटुंबाला थोडा वेळ द्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
प्रिय व्यक्तींकडून महत्त्वाची माहिती पदरी पडेल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून असलेली चिंता दूर होईल. आर्थिक घडी व्यवस्थित बसल्याने आनंदात वाढ होईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहिल.
6 / 10
नकारात्मक विचारांमुळे आसपासचं वातावरण भयावह वाटेल. नातेवाईकांसोबत बोलणं करताना एक वेगळी भीती सतावेल. कठोर मेहनतीने संकटावर मात करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे असेल.
7 / 10
कर्जामुळे आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली राहिल. छोट्या छोट्या कामातून पैसे कमवा. नव्या ओळखी या काळात होतील. काही गोष्टी ठरल्याप्रमाणे घडल्याने दिलासा मिळेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
8 / 10
प्रेम प्रकरणात फटका बसल्याने एकटेपणा जाणवेल. एकटेपणामुळे बऱ्याच गोष्टी नकोशा होतील. त्यामुळे दुखातून सावरण्यासाठी मित्रांच्या भेटीगाठी घ्या. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहिल.
9 / 10
मित्रमंडळीसोबत काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल. कदाचित एखाद्या मोठ्या समस्येचं समाधानही मिळेल. कोणतंही काम करताना जोखिम किती याचं आकलन करा. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहिल.
10 / 10
काही गोष्टी उशिराना हाती मिळतात हे लक्षात ठेवा. कुटुंबात प्रॉपर्टीवरून वाद होऊ शकतात. डोकं शांत ठेवून कामं करत राहा. कदाचित योग्य वेळी सर्वकाही ठिक होईल. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहिल. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)