Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 11 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
कायदेशीर प्रकरणात आज यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच बिल्डरकडून टोकन रक्कम हाती पडू शकते. जागेवरून असलेला वादही शमण्याची शक्यता आहे. शुभ अंक 3 आणि शुभ रंग हिरवा राहील.
3 / 10
काही जणांचा भेटीगाठी आज होतील. काही कामं पूर्ण होतील. तसेच किचकट कामांसाठी मार्ग सापडेल. कुटुंबातील वडिलधाऱ्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 22 आणि शुभ रंग निळा राहील.
4 / 10
आजचा दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला राहील. नव्या योजना मार्गी लागतील. घरात किंवा कार्यालयात वस्तुंची चोरी होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात काही कारणास्तव वाद होऊ शकतात. शुभ अंक 8 आणि शुभ रंग लेमन राहील.
5 / 10
खर्चाचा भार वाढू डोक्यावर वाढू शकतो. त्यामुळे कर्जाची परतफेड करणं कठीण जाईल. विनाकारण पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
सकारात्मक विचार करत राहा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. काही अडचणींवर मात मिळवण्यात यश मिळेल. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. शुभ अंक 4 आणि शुभ रंग निळा राहील.
7 / 10
कौटुंबिक वातावरण गढुळ असेल तर त्याचा त्रास आपल्याला होतो. त्याचे परिणाम आपल्या कामावर दिसतात. कामात मन लागत नाही. त्यामुळे जास्त विचार न करता शांत राहण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग लेमन राहील.
8 / 10
तुमच्या व्यक्तीमत्त्वाची छाप आज समाजमनावर पडलेली दिसेल. कोणताही निर्णय तुमच्या पथ्यावर पडलेला दिसेल. पैशांची बचत करा. विनाकारण पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
आपल्या कामाला प्राधान्य द्या. व्यवसायात भरभराट व्हावी असं वाटत असेल तर ग्राहकांशी प्रेमाने वागा. त्यांच्या गरजा समजून घ्या आणि तशी सेवा देण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग पांढरा राहील.
10 / 10
कधी कधी तुमचा साधा स्वभाव तुम्हाला अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे काही ठिकाणी कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात दूरगामी परिणाम दिसून येतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग हिरवा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)