Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 12 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Dec 11, 2023 | 9:50 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
नशिबाची उत्तम साथ मिळेल. मित्रांच्या मदतीने काही कामं सोपी होतील. काही योजना पूर्ण करताना काळजी घ्या. जोखिम असली तरी फायदाही तितकाच होईल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
नातेवाईकांकडून त्रास देण्याचा प्रयत्न होईल. प्रगती होताना दिसली की अनेकांना पोटदुखी होते याची प्रचिती येईल. मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

4 / 10
आपण जसे विचार करतो अगदी तसंच आपल्यासोबत घडत असतं हे लक्षात ठेवा. काही गुपितं असतात ती कोणासोबत उघड करू नका. अन्यथा भविष्यात फटका बसू शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
जवळच्या व्यक्तींकडून मदतीचा हात मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जितकी मदत होईल. तितक्याच अपेक्षाही वाढतील. भविष्यात जर मदत केली नाही तर मग त्रासाला सामोरं जावं लागेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
दुसऱ्यांकडे बघून कधी कधी आपण तशीच कृती करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो. तशीच प्रचिती आज तुम्हाला येईल. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
कौटुंबिक स्तरावर चांगलं वातावरण राहील. वडिलधाऱ्या व्यक्तींकडून चांगलं मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे किचकट कामंही पूर्ण होतील. शेवटपर्यंत प्रयत्न करणं सोडू नका. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
कठोर मेहनत करताना अनेक जण पाठीमागे निंदा करतात. पण एकदा का यश हाती लागलं हेच लोकं पाठिपुढे करतात. याची प्रचिती देणारा हा दिवस आहे. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
प्रेम प्रकरणात बऱ्याच घडामोडी घडतील. कौटुंबिक स्तरावर तणावाचं वातावरण राहील. त्यामुळे एकदम हतबल होऊन जाल. डोकं शांत ठेवा आणि काही दिवस वाट पाहा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आपल्याला एखाद्या गोष्टीचा अहंकार झाला की त्याचा फटका बसतो. असाच आजचा दिवस आहे. असा दणका मिळेल की पाठचं सर्वकाही आठवेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)