Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 12 सप्टेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आज तु्म्हालाा आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. कायदेशीर प्रकरण तुमच्या बाजूने झुकू शकते. गुप्तशत्रूंना मात द्याल. रागावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
आज आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार काही कामं पार पाडाल. काही कामं झटपट पार पडल्याने आत्मविश्वास दुणावलेला राहील. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. प्रेम प्रकरणात अडचण येईल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
4 / 10
आज दिवसभर कसलीतरी चिंता लागून राहील. तु्मच्यावर काही जबाबदाऱ्या पडतील. काही चुकांमुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नव्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. जास्तीत जास्त पाणी प्या आणि योगा करा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
6 / 10
आर्थिक नियोजन करून योग्य ती पावलं उचला. जोखिम जास्त असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. उद्योग धंद्याचा हळूहळू विस्तार करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
व्यवसायासाठी तुम्हाला मदतीची गरज भासू शकते. त्यामुळे ओळखीच्या लोकांकडे आपला प्रस्ताव ठेवा. त्यांची गुंतवणूक योग्य ठिकाणी असल्याचं पटवून द्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
घरात पाहुणे येतील त्यामुळे उत्साही वातावरण राहील. गेल्या काही दिवसांपासून असलेला ताण दूर होईल. आई बाबांना खूपच आनंद होईल. जुन्या गोष्टींना उजाळा मिळेल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या प्रेमसंबंधांमध्ये तणाव निर्माण होईल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. धार्मिक विधी घरात पार पडतील. वाणीवर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. तसेच बुडालेले पैसे सोडून देण्याची वेळ येईल. पण प्रयत्न सोडू नका. मुलांसोबत काही कारणास्तव मतभेद होतील. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)