अंकशास्त्राचं गणित मंगळवार 17 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
तुमच्या आर्थिक स्थितीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला मागील गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. वाद टाळण्यासाठी जोडीदारासोबत नम्रतेने वागा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करू शकता. एखाद्या चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते. तुमच्या जोडीदाराशी बोलताना शब्द जपून वापरा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
4 / 10
आज हाती घेतलेली कामं पूर्ण करताना त्रास होईल. काही कामं तर होणारच नाहीत त्यामुळे त्रास होईल. तुमचे काही नुकसान होऊ शकते. कौटुंबिक पातळीवर तणावाचं वातावरण राहील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. काही व्यवसायातून तुम्हाला फायदा दर्शवत आहे. काही नुकसानीचं नफ्यात रुपांतर होईल आणि तुमचे आर्थिक स्थिती सुधारेल. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
6 / 10
आज तुम्ही आनंदाने कामं पूर्ण कराल. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुम्हाला बढती मिळू शकते. गुप्तशत्रूंवर सहज मात मिळवाल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.
7 / 10
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली वैचारिक गोंधळाची स्थिती नियंत्रणात आहे. पुढे ढकललेले काम सुरू करू शकता. आज तुमच्या मेहनतीचे फळ मिळवू शकता. तुम्ही परदेशात जाण्याचाही योजना आखू शकता. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
8 / 10
आज तुम्ही कौटुंबिक बाबींमध्ये व्यस्त राहू शकता. कला, चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या फायदा होईल. तुमच्यात नम्र भाव वाढलेला दिसेल. विद्यार्थी त्यांच्या करिअरच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकतात. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.
9 / 10
आज आरोग्याच्या समस्या डोकं वर काढू शकतात. याचा तुमच्या कामावर आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. धीर धरा आणि नवीन गुंतवणूक टाळा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. शुभ रंग 26 आणि शुभ रंग निळा राहील.
10 / 10
जुनाट आजारामुळे आज तुम्हाला अस्वस्थ वाटेल. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. लक्झरी वस्तू खरेदी करणं टाळा. भविष्याच्या दृष्टीकोनातून पैशांची बचत करा. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)