Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 20 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
कौटुंबिक वादामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. काही कारणामुळे वाद टोकाला जातील. पण शांततेने वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा न्यायालयाची पायरी चढावी लागेल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
आजचा दिवस सामाजिक कार्यात घालवाल. यामुळे चांगलं काम केल्याचं पुण्य पदरी पडेल. दुरोगामी विचार करता काही गोष्टींची मुहूर्तमेढ रोवणं गरजेचं आहे. शुभ अंक 22 आणि शुभ रंग करडा राहील.
4 / 10
काही गोष्टी चांगल्यासाठी होतात हे लक्षात ठेवा. कारण प्रत्येक गोष्ट घडण्यामागे कारण असतं. त्यामुळे चुकीचं वागून पश्चाताप करण्याची वेळ येईल, हे लक्षात ठेवा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
कुटुंबातील सदस्यांना मदत करण्याची आज संधी मिळेल. ती संधी गमावू नका. मोठ्या सदस्याप्रमाणे मदतीला धावून जा. कुटुंबासोबत एकत्र प्रवास करण्याचा योग जुळून येईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
6 / 10
आजचा दिवस संघर्षमय राहील. काही कामांचं गणित बिघडल्याने मन अस्वस्थ राहील. आपण काय विचार करतो आणि काय स्थिती झाली, यामुळे मन खाईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
उद्योग धंदा करणाऱ्या व्यक्तींना हा दिवस चांगला जाईल. काही करारातून चांगला परतावा मिळेल. त्यामुळे दिवसभर आनंदी राहाल. कौटुंबिक वातवरण चांगलं राहील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
कुटुंबासोबत वेळ व्यतित घालवणारा आजचा दिवस आहे. आपल्या बुद्धिच्या जोरावर काही कामं पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढल्याने काही जोखिमीची कामं चुटकीसरशी पूर्ण कराल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. पण आतातायीपणे कोणतंही पाऊल उचलू नका. जो निर्णय असेल तो मान्य करा आणि पुढे जा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल आहे.
10 / 10
नवीन निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जुन्या अनुभवातून शिकून पुढे जा. हितशत्रूंना तुमच्या निर्णयाने पोटदुखी होऊ शकते. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लेमन राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)