Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 13 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
दुसऱ्यांचं ऐकून घेतलेला निर्णय चांगलाच महागात पडू शकतो. कारण त्याचा आर्थिक फटका आपल्याच बसू शकतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.
3 / 10
आपल्या कामाचा आवाका आणि आपली कार्यक्षमता याचं आकलन करून घ्या. भारंभार कामं घेऊन एकही धड होणार नाही. एक एक करून कामं उरकण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
4 / 10
नव्या विचारांसह पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मागे जे काही झालं गेलं ते सोडून द्या. जवळच्या व्यक्तींकडून आर्थिक फायदा मिळेल असा विचार करू नका. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
आज दिवसभर एकटेपणा जाणवेल. काही भुतकाळातील गोष्टी त्रासदायक ठरतील. आरोग्याची काळजी घ्या. काही त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आपण जसा विचार करतो तशीच कृती आपल्या हातून घडत असते. त्यामुळे सकारात्मक विचार करत राहा. आर्थिक जोखिम मोठी असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.
7 / 10
दिवसभर काही ना काही कामात व्यस्त राहाल. एक काम आटोपलं की लगेच दुसरं काम समोर असेल. पण दिवसअखेर कामं झटपट झाल्याने आनंद होईल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. यामुळे व्यवसायात बऱ्यापैकी मदत होईल. काही नवीन करार निश्चित होतील. आर्थिक स्थिती या कालावधीत सुधारेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.
9 / 10
नातेवाईकांकडून उत्तम साथ मिळेल. लग्नासाठी प्रयत्न करणाऱ्या जातकांना स्थळं चालून येतील. विवाह जुळू शकतात. घरातील किंमती वस्तू जपून ठेवा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
एकमेकांशी भावनिक संबंध असले की त्रास होतो. कठीण निर्णय घेताना अडचणी येतात. त्यामुळे अनेकदा आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. असाच आजचा दिवस आहे. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)