Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 19 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
दिवसभर कसलीतरी चिंता लागून राहील. मन कशातच रमणार नाही. त्यामुळे दिवस असाच निघून जाईल. डोकं शांत ठेवा आणि आराम करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
प्रत्येक गोष्ट आपण बोलू तशीच होत नाही. त्यामुळे दोन पावलं मागे आल्याने काही बिघडत नाही. प्रयत्न करत राहा. आपले कोणावर लादू नका. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
4 / 10
कोणताही प्रश्न प्रेमाने सोडवला की सुटतो हे लक्षात ठेवा. त्रागा करून काही निर्णय घेऊ नका. शांतपणे एक एक गुंता सोडवत जा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
काही क्षण आपल्या स्मरणात कायम राहतात. त्या आठवणींने आपण भावूक होऊन जाल. पण गेलेले क्षण परत येत नाहीत हे लक्षात ठेवा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
6 / 10
शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर जरा सांभाळून. मोठी रक्कम गुंतवण्यापूर्वी विचार करा, नाहीतर फटका बसू शकतो. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.
7 / 10
लहान मुलं आपला चिंता दूर करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करा. त्यांच्या प्रश्नांनी तुमचं मन प्रसन्न होईल. दिवसही चांगला जाईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
8 / 10
कितीही काही केलं तरी आपलं हे आपलंच असतं. त्यामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या. आई वडिलांना काय हवं काय नको याबाबत विचारणा करा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.
9 / 10
काही कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. या प्रवासात काही प्रश्न मार्गी लागतील. काही लोकांच्या ओळखी होतील आणि नवे आर्थिक स्रोत निर्माण होतील. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.
10 / 10
प्रयत्नांना यश मिळते याची प्रचिती देणारा हा दिवस आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. आपली उर्जा योग्य ठिकाणी लावा आणि सकारात्मक प्रयत्न करा. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)