Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 25 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजच्या दिवसात पैशांचा व्यवहार काळजीपूर्वक करा. काही व्यवहारात फटका बसू शकतो. अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
काही चांगल्या कामांमुळे नावलौकिक वाढेल. आपल्या जीवनाचा आनंद घ्या. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात वैर करण्यात अर्थ नाही. मित्रांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा द्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
4 / 10
आज खरेदी विक्रीबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. पण त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसणार नाही याची काळजी घ्या. काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
भविष्याच्या दृष्टीकोनातून आर्थिक नियोजन करा. आज मूड चांगला राहील. त्यामुळे लगेचच कोणाला अश्वासन देऊ नका. त्यामुळे आर्थिक फटका बसू शकतो. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
6 / 10
तुमच्यावर आधारित असलेल्या लोकांची काळजी घ्या. त्यांना दुखवू नका. जुगार आणि कर्जाच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला दिवसभर कसलीतरी चिंता लागून राहील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.
7 / 10
आज दिवसभर कामामुळे व्यस्त राहाल. मेहनत घेऊन किचकट काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जीवनात काही बदल आवश्यक असतात. त्यामुळे बदल स्वीकारा आणि पुढच्या कामाला लागा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
8 / 10
सार्वजनिक क्षेत्रात काम करणं तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यामुळे ओळखी वाढतील आणि त्याचा तुमच्या कामावर सकारात्मक परिणाम होईल. विदेशात व्यवसायाचा योग आहे. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.
9 / 10
गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या मेहनतीला फळ मिळेल. कौटुंबिक स्तरावर आनंदी वातावरण राहील. घराची डागडुजी करू शकता. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.
10 / 10
मोठी उडी घेण्यापूर्वी छोटी छोटी पावलं टाका. नक्कीच यश मिळेल. नवीन नातेसंबंध तयार होतील. विजय दृष्टीक्षेपात असल्याचं पाहून आत्मविश्वास दुणावेल. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)