Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 27 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस मनासारखा जाईल. दिवसभर उत्साहित राहाल. जवळच्या व्यक्तीचा सहवास लाभल्याने मागची सर्व दु:ख विसरून जाल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पांढरा असेल.
3 / 10
एखाद्या गोष्टीच्या मागे हात धरून लागलं की ती गोष्ट आपल्या पदरी कधी ना कधी पडते. असाच आजचा दिवस आहे. काही अडकलेली कामं आज पूर्ण होतील. शुभ अंक 20 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
4 / 10
जीवनात काही कठीण प्रसंग येतात. त्यांचा सामना करण्याची तयारी ठेवा. कधी कधी अनपेक्षित घटना घडतात. खचू नका आणि येईल त्या प्रसंगाचा धीराने सामने करा. शुभ अंक 13 आणि शुभ रंग पिवळा राहील.
5 / 10
आरोग्य विषयक तक्रारीमुळे आज पुरते हैराण व्हाल. नेमकं काय होतं आणि काय झालं याची शहनिशा होईपर्यंत जीव कासावीस होईल. डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
6 / 10
जोडीदारासोबत प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येकाला भावना असतात. आपल्या मनासारखं प्रत्येकाने वागावं असं करून चालणार नाही. वेळीच काही पावलं मागे घ्या. शुभ अंक 8 आणि शुभ रंग निळा राहील.
7 / 10
कौटुंबिक पातळीवर आपली किती गरज आहे याची जाणीव होईल. त्यामुळे कुटुंबासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करा. त्याच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करा. शुभ अंक 17 आणि शुभ रंग पिवळा राहील.
8 / 10
घरात काही कारणास्तव वाद होऊ शकतात. काळजी घ्या. शब्दाने शब्द वाढतो हे लक्षात ठेवा आणि तोंडावर ताबा ठेवा. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष ठेवा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग हिरवा राहील.
9 / 10
गुप्तशत्रूंकडून आज त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधपणे उचला. कामाच्या ठिकाणी काहीही काम करताना लक्षपूर्वक करा. जवळच्या व्यक्तींकडून दगाफटका होऊ शकतो. शुभ अंक 23 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
10 / 10
समाजाला आपण काहीतरी देणं असतो. त्यामुळे समाजाचं ऋण फेडण्यास विसरू नका. जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा समाजासाठी पुढे या. सढळ हस्ते मदत करा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)