Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 2 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आज दिवसभर सकारात्मक उर्जेसह राहाल. काही आध्यात्मिक कार्य हातून पार पडतील. एखाद्या तीर्थस्थळी जाण्याचा योग जुळून येईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.
3 / 10
तब्येतीची काळजी घेणं खूपच महत्त्वाचं आहे. गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही आजार कायमस्वरुपी आपल्यासोबत असतात ही गोष्ट लक्षात ठेवा. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.
4 / 10
काही गोष्टी आपल्या हातून नकळत घडत असतात त्यामुळे त्याबाबत जास्त काळ त्रास करून घेऊ नका. पुन्हा नव्याने सुरुवात करा. गरीबांना अन्नदान करा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी असेल.
5 / 10
काही लोकांसोबत राहणं आनंददायी असतं. त्यांच्या सकारात्मक उर्जेचा प्रभाव आपल्यावर पडतो. त्यामुळे त्यांच्या संगतीत राहणंच योग्य राहील. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.
6 / 10
आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. त्यामुळे काळजी करू नका आणि आत्मविश्वासाने पुढे जा. चांगल्या कामाची चांगली फळं मिळतात. शुभ अंक 18 आणि शुभ रंग हिरवा राहील.
7 / 10
महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. घाईगडबडीत पाऊल उचलू नका. अन्यथा आयुष्यभर पश्चातापाची वेळ येईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
8 / 10
जेव्हा आपले चांगले दिवस होते तेव्हा आपण कसं वागलो याबाबत विचार करा. नियतीचा खेळ वेगळा असतो. आपण जसं वागतो तसंच आपल्यासोबत घडतं. शुभ अंक 11 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
9 / 10
कठोर परिश्रम केल्याशिवाय फळ मिळत नाही हे लक्षात ठेवा. गुंतवणूक करा आणि त्यावर मेहनत घ्या. नक्कीच चांगलं फळ मिळेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.
10 / 10
आजचा दिवस निर्णायक राहिल असं ग्रहमान आहे. गेल्या काही दिवसात केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. पण अति आत्मविश्वास बाळगू नका. सावधपणे निर्णय घ्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)