Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 9 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आर्थिक स्थिती पाहून जोखिम पत्कारली तर नक्कीच फायदा होईल. कोणच्याही मदतीची वाट पाहू नका. कामाला सुरुवात करा. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
काही गोष्टी या शेअर करण्यासारख्या नसतात. त्या आपल्या मनातच ठेवलेल्या बऱ्या असतात. अन्यथा वाद होऊन नातं तुटू शकतं. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
4 / 10
आतापर्यंत केलेल्या कामाचं योग्य फळ तुम्हाला मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
अचानक धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे हुरळून जाऊ नका. पैशांपेक्षा काही नाती मोठी असतात हे लक्षात ठेवा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
6 / 10
आपल्या शक्तीचा योग्य प्रकारे वापर करा. कमकुवत लोकांना उगाचच त्रास देऊ नका. भविष्याच्या दृष्टीने विचार करून एक एक पाऊल टाका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची संधी प्रत्येकाला मिळते. अशी तुम्हाला चालून येईल. त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
वडिलोपार्जित जमिनीतून फायदा होईल. कुटुंबासोबत एकत्र जेवणाची संधी मिळेल. बहिणीकडून चांगलं सहकार्य मिळेल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
कठीण प्रसंगांपासून दूर जाण्यापेक्षा त्याचा सामना करणं गरजेचं आहे. यातून बराच अनुभव पदरी पडतो. शक्यतो आर्थिक व्यवहार करणं टाळा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
कधीतरी आपल्या आयुष्यात वाईट घटना घडतात. त्याचा त्रागा करून चालणार नाही. नातेवाईकांना भेटण्याचा योग जुळून येईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)