Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 20 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आपल्याला करिअरच्या दृष्टीने एक एक पाऊल टाकणं गरजेचं आहे. कारण भविष्यात आपल्या मदतीला कोण येईल याची काही शाश्वती नाही. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
आपल्या कामाचं सोडून इतरांवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या लोकांपासून लांब राहावं. कारण एकदा त्यांची गरज संपली की तुमच्याच पाठीत खंजीर खुपसतील. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
4 / 10
काही कारणास्तव चिडचिड होऊ शकते. त्यामुळे कोण काय बोलते याकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे आणखी मनस्ताप वाढू शकतो. कामाकडे लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
आज आर्थिक गणित थोडं विस्कळीत झाल्याचं दिसून येईल. त्यामुळे इतरांकडे पैसे मागण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे मदतीला कोण उभं राहतं याची माहिती मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
6 / 10
वडिलधाऱ्या व्यक्तींकडून तुम्हाला आर्थिक मदत होऊ शकते. त्यामुळे त्यांचा मान राखा. त्यांनी दिलेल्या शब्दाचं पालन करा. करिअरमध्ये एक पाऊल पुढे टाकाल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
प्रयत्न करण्याशिवाय गत्यंतर नाही हे लक्षात ठेवा. बसल्या जागी कोणी आयतं आणून देणार नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. नक्कीच यश मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
आपलं मागे किती नुकसान झालं आहे याचा अंदाज घ्या. कारण दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही. पुन्हा एकदा विश्वास ठेवणं महागात पडू शकतं. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
आपल्यातील वाईट गुण ओळखून त्यावर मात करा. त्यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल. शक्तिपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही गोष्ट लक्षात ठेवा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
कोणत्याही गोष्टीची खरेदी विक्री करताना तपासून घ्या. कारण फसवणूक होऊ शकते. पैसा जरा जपून वापरा. कधी काय गरज पडेल सांगता येत नाही. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)