Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 12 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस संमिश्र प्रतिक्रियांचा जाईल. नवीन व्यवसाय सुरू कराल. नातेवाईकांशी तुमचा संवाद वाढेल. नैराश्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.
3 / 10
आज ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल.तुमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, ज्या तुम्ही पूर्ण कराल. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.
4 / 10
आज तुम्ही सामाजिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. संयम बाळगल्यास रखडलेल्या योजना यशस्वी होतील.शेजारी तुमची कामे पूर्ण करण्यात मदत करतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.
5 / 10
आज मुलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. एखाद्या अज्ञात व्यक्तीच्या मदतीने तुमचे मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सदस्यांना परस्पर सामंजस्याने घरातील कोणत्याही समस्येवर तोडगा काढता येईल.शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.
6 / 10
आज तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला जाणार आहे. शुभ अंक 30 आणि शुभ रंग जांभळा राहील.
7 / 10
आज तुम्ही काही नवीन काम सुरू करण्यासाठी उत्साहित असाल.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज चांगली बातमी मिळेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
8 / 10
आज तुम्ही काही वैयक्तिक बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. कुटुंबातील सदस्य तुम्ही केलेल्या कामामुळे खूप खुश दिसतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. शुभ अंक 20 आणि शुभ रंग हिरवा राहील.
9 / 10
आजचा दिवस आयुष्यातील मैलाचा दगड ठरेल.समाजात तुम्ही केलेल्या कामाचे खूप कौतुक होईल.तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू शकता. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.
10 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुम्हाला एखाद्याकडून चांगली बातमी मिळू शकते, घरात आनंदाचे वातावरण असेल.वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)