Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 16 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आज दिवस तणावात जाईल. काही कामं होता होता राहून जातील. त्यामुळे दिवस कंटाळवाणा असेल. सरतेशेवटी घरच्यांवर याचा राग काढू नका. शुभ अंक 5 आणि शुभ रंग जांभळा राहील.
3 / 10
आपण घरासाठी घरगुती वस्तू खरेदी करू शकता. पण आज काही गोष्टीसाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शुभ अंक 12 आणि पांढरा राहील.
4 / 10
कोणाशी बोलताना काळजी घ्या. आपल्या शब्दांमुळे भांडणं होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या व्यवहारातून वाद टोकाला जावू शकतो. व्यवसाय सुरु करण्याचा विचार करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
5 / 10
व्यवसायासोबत एखादा जोडधंदा करा. जेणेकरून अडीअडचणीच्या काळात मदत होईल. कोर्टकचेरीच्या प्रकरणात डोकेदुखी वाढेल. दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करू नका. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आज दिवस आनंदात जाईल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे दिवस मस्त जाईल. दूरच्या नातेवाईकाची बातमी ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल.शुभ अंक 2 आणि शुभ रंग हिरवा राहील.
7 / 10
छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही तुम्हाला राग अनावर होईल. एखादं काम पुन्हा करावं लागल्याने चिडचिड होईल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणू नका. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील.
8 / 10
शक्य तितका संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. रागाच्या भरात बोललेला एखादा शब्द भविष्यात मोठी समस्या निर्माण करेल. तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही कितीही जवळचा नातेवाईक असला तरी त्यांच्या कामात नाक खुपसू नका. शुभ अंक 1 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
9 / 10
घरामध्ये शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या व्यवहारातून निश्चितच फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदासाठी दुचाकी किंवा सेकंड हँड कार खरेदी करण्याची शक्यता आहे.शुभ अंक 15 आणि शुभ रंग नारंगी राहील.
10 / 10
वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेबाबत काही वाद असतील तर ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा. काही गोष्टी डोकेदुखी ठरतील पण सामंजस्यपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. परदेशात नोकरी करणाऱ्यांना गावी येण्याचा योग आहे. शुभ अंक 5 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)