Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 26 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं खूपच गरजेचं आहे. कारण अनेकदा आपल्या वागण्यामुळे नाती तुटून जातात. आपल्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.
3 / 10
आपण करत असलेल्या कामात यश मिळेल. दिवस अनुकूल असून काही कामं पूर्ण करता येतील. सर्वच गोष्टींमध्ये पैसा शोधणं सोडून द्या. शुभ अंक 7 आणि शुभ अंक लाल राहील.
4 / 10
वैवाहिक जीवनात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण भांडणं होणार नाहीत याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी भार वाढेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग पिवळा राहील.
5 / 10
आज नशिबाची उत्तम साथ मिळेल. याची अनुभूती काही कामांमध्ये येईल. न होणारं काम झाल्याने आश्चर्याचा धक्का बसेल. कायदेशीर प्रकरणात काळजी घ्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
6 / 10
प्रेमप्रकरणात काही अक्रित घटना घडतील. त्यामुळे संपूर्ण दिवस अस्वस्थेत जाईल. वैवाहिक जीवनात काही उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
7 / 10
कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण राहील. काही कार्यक्रमांचं आयोजन कराल. दिवस एकदम उत्साहात जाईल. संध्याकाळी मित्रांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा राहील.
8 / 10
आजचा दिवस खर्चिक राहील. नको त्या कामासाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे खिशावर भार पडेल. कामाच्या ठिकाणी दिवस बरा जाईल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.
9 / 10
आपण जसा विचार करतो तसाच दिवस जात असतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. प्रेम प्रकरणात पदरी निराशी पडू शकते. शुभ अंक 18 आणि शुभ रंग पांढरा राहील.
10 / 10
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. कारण एक चूक चांगलीच महागात पडू शकते. कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी आहे. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)