Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 3 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक असणार आहे. आज केलेल्या कामामुळे तुम्हाला समाजात सन्मान मिळू शकेल.आज आपण आपले काम शांततेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 35 आणि शुभ रंग लाल राहील.
3 / 10
आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. कोणत्याही कामात आळस करू नका तर तुमचे काम सहज आणि वेळेवर पूर्ण होईल.जोडीदाराच्या भावना समजून घेण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी व्हाल. शुभ अंक 31 आणि शुभ रंग जांभळा राहील.
4 / 10
आज तुम्ही कोणत्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल. वैयक्तिक आयुष्यात सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग पिवळा राहील.
5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. तुमच्या बहुतेक योजना पूर्ण होऊ शकतात. इतरांशी बोलणे किंवा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग नारंगी राहील.
6 / 10
आज तुम्ही जुन्या मित्रांना भेटण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला लोकांशी भेटण्यात आणि बोलण्यात आनंद वाटेल. घरातील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. शुभ अंक 17 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
आज मदतीची गरज असताना कोणीतरी तुम्हाला मदत करेल. तुम्हाला लोकांशी भेटण्यात आणि बोलण्यात आनंद वाटेल. काही कामासाठी अनेक मोठे निर्णय घेऊ शकता. शुभ अंक 10 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
8 / 10
आज तुमच्या सकारात्मक उर्जेने महत्त्वाची कामे पूर्ण होतील. जे काही नवीन करायचे आहे, ते आजच पूर्ण करायचा प्रयत्न करा. तुमचे काम पूर्ण करण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हाल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
9 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त दिवस असू शकतो. तुमच्या हट्टीपणामुळे आज इतरांना त्रास होऊ शकतो. नवीन कामासाठी सल्ला घ्या.धार्मिक कार्यातही सहभागी होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 1 आणि शुभ रंग निळा राहील.
10 / 10
आज तुम्हाला एखादे मोठे काम पूर्ण करण्याची जबाबदारी मिळू शकते. तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मदत मिळू शकते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)