Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 5 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आपल्या बरोबर कोण आणि कोण नाही याची प्रचिती येईल. त्यामुळे संकटाचा सामना एकट्याने केल्याशिवाय पर्याय नाही. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.
3 / 10
आज कामाचा डोंगर समोर असेल. त्यामुळे ती कामं करण्याशिवाय पर्याय नाही. कोणाच्या भरवश्यावर कामं सोडू नका. कोण मदत करेल याची अपेक्षा सोडा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.
4 / 10
आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. कारण आपल्याला त्यातून पैसे मिळतात हे विसरू नका. एकाचवेळी अनेक जबाबदाऱ्या येऊन पडतील. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
5 / 10
आपल्या काही जणांना नकार देणं जमलं पाहीजे. नाहीतर आपला गैरफायदा घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. लोकं स्वत:चा फायदा बघतात. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे काहीच हालचाल करता येणार नाही. नोकरीच्या ठिकाणी होत असलेल्या त्रासाला सामोरं जावं लागेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
7 / 10
एका दिवसाने काय फरक पडतो या भ्रमात राहू नका. सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. मित्रांकडून मदत होईल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
कामानिमित्त प्रवास करण्याची वेळ येईल. काही ठिकाणी मनात भीती लागून राहील. काम होईल की नाही याची चिंता सतावेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.
9 / 10
आपल्या समस्या दुसऱ्यांसमोर मांडून काही एक उपयोग नाही. कारण ते लोकं फक्त तुमच्या समस्या ऐकतील आणि मजा घेतील. त्यांना तुमच्या आयुष्याशी काही देणंघेणं नाही. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.
10 / 10
प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. त्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जाईल. तुमच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून घरचेही विचारात पडतील. कुठे काही प्रकरण तर नाही ना असा प्रश्न पडेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)