Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 17 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आपल्या जवळ कोणाला ठेवायचं आणि कोणाला लांब ठेवायचं याचा जाणीव असणं गरजेचं आहे. कारण कधी कधी जवळची व्यक्तीच तुमची वाट लावत असते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
आपल्या एखाद्या गोष्टीचा वाईट विचार केला की आपल्या सोबत तसंच काहीसं घडतं. व्यवसायात जोखिम घेताना काळजी घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
4 / 10
कधी कधी आपल्या हातून काही चुका घडतात. त्याचा पश्चाताप करण्याची वेळ नंतर येते. त्यामुळे आता भुतकाळात रमू नका. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
वेळेचं महत्त्व ओळखणं गरजेचं आहे. कारण काही कामं वेळेतच होणं गरजेचं आहे. चांगल्या वाईट गोष्टींची अनुभूती तुम्हाला येत राहील. त्याचा विचार करू नका. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
6 / 10
मेहनत करत राहा तुम्हाला इच्छित फळ नक्कीच मिळेल. प्रवासात काही चांगल्या लोकांच्या भेटीगाठी होतील. काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.
7 / 10
आपल्या भावनांना आवर घालणं महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी आपण भावनिक होऊन निर्णय घेतो. त्याचा फटका आपल्याला नंतर भविष्यात बसतो. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
8 / 10
काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. त्यामुळे भविष्यात त्याचा फायदा होईल. वैयक्तिक फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.
9 / 10
आपल्या विचारांवर ताबा ठेवा. आपली मतं इतरांवर लादू नका. त्यामुळे तुमचंच नुकसान होऊ शकतं. खर्चावर नियंत्रण ठेवा. कदाचित मोठा फटका बसू शकतो. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.
10 / 10
आपल्याला इतरांचे दोष लगेच दिसतात पण आपल्यातील दोष शोधणं कठीण आहे. कायम आपणच बरोबर आहोत असं वाटत असतं. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)