Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 20 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आपण हाती घेतलेलं काम पूर्ण करा. आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या कामासाठी इतरांची मदत मिळेल. एकंदरीत मागच्या काही दिवसांमध्ये घेतलेली मेहनत फळास येईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
आर्थिक स्थिती व्यवस्थित करण्यासाठी वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण एकदा गाडी रुळावरून घसरली की पुन्हा रुळावर आणणं कठीण जातं. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
4 / 10
आपल्या कामाचा फायदा आपल्यालाच होतो. त्यामुळे चालढकलपणा करणं बंद करा. आजचं काम उद्यावर ढकलून काही उपयोग होत नाही. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
आजचा दिवस आनंदात जाणारा आहे. कुटुंबियांसोबत वेळ मजेत घालवा. त्यामुळे कुटुंबाचं दुखणं तुम्हाला कळून जाईल. कोणताही निर्णय घेताना दहावेळा विचार करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
6 / 10
अचानकपणे कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे दिवसभर अस्वस्थ राहाल. जवळच्या सहकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने त्रास वाढेल. पण डोकं शांत ठेवून एक एक काम करून घ्या. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.
7 / 10
आपल्या जवळची लोकं आपल्यासोबत कशी वागतात याची प्रचिती येईल. त्यामुळे भावनांना आवर घाला. आर्थिक व्यवहारात नातीगोती जपत बसू नका. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
8 / 10
पत्नीसोबत असलेलं मतभेद त्रासदायक ठरतील. भांडण विकोपाला जाईल. त्यामुळे दिवसभर कशातच मन रमणार नाही. भविष्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.
9 / 10
आपल्या दुखाच्या क्षणात कोणी मदत केली हे विसरू नका. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहा. त्यांचं प्रेम तुम्हाला मिळेल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.
10 / 10
नोकरीच्या ठिकाणी तणावाचं वातावरण राहील. काही गोष्टींमुळे विनाकारण त्रास होईल. पण आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत. कुणावर जास्त विश्वास ठेवणं महागात पडेल. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)