Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 23 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे.या काळात तुम्हाला तुमच्या खर्चावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.कार्यालयातील वातावरण प्रसन्न राहील. घराची जबाबदारी तुमच्यावर पडू शकते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा दिवस देईल.तुमच्या व्यावसायिक इच्छा पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही व्यवसाय सुरू करू शकता. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडाल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
4 / 10
आज तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील. व्यवसायात कोणताही निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. भागीदारीत व्यवसाय करणे टाळा. तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून राहू नका. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी आशादायी असेल. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजांची काळजी घ्याल.ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळतील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
6 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी यशाचा दिवस असेल. आर्थिक लाभाचे स्रोत मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. ऑफिसमधील वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील आणि तुम्हाला भेटवस्तू देतील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.
7 / 10
तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला व्यवसायात करिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी वेळ चांगला आहे. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी तुमची जीवनशैली बदला. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
8 / 10
आज तुम्ही आशावादी राहाल.तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. पसंतीच्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.
9 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अपेक्षांनी भरलेला असेल. आज तुम्ही आळस टाळा अन्यथा तुमचे काम पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो.तंत्रज्ञानाशी संबंधित लोकांना नवीन संधी मिळतील. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.
10 / 10
आज तुमचा दिवस रोजच्या तुलनेत चांगला जाईल. तुमच्या विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे.तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)