Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 3 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
कामाच्या वेळी काम हे धोरण ठेवा. कारण कामाचा पसारा आटोपण्यासाठी कोणी धावून येणार नाही. त्याच्यामुळे तुमच्याच कामाचं नुकसान होईल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
गेल्या काही दिवसांपासून आलेली मरगळ आता दूर करा. कारण आपल्या मदतीला कोणी येईल हे विसरून जा. आपली कामं आपल्यालाच करावी लागतात. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
4 / 10
कोणतंही नातं हे विश्वासावर टिकतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा आदर करा. तसेच कामाचं नियोजन करून एक एक कामं आटपा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
कायदेशीर प्रकरणात तु्म्हाला अपेक्षित मदत मिळेल. तसेच गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली धावपळ थांबेल. आर्थिक स्थिती सुधारेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
6 / 10
काही कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. प्रवासात तब्येतीची काळजी घ्या. बाहेरचं खाणं शक्यतो टाळा. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
दिवसभर कामात व्यस्त राहाल. प्रिय व्यक्तीला भेटणं होऊ न शकल्याने दिवस सरताना निराश व्हाल. कौटुंबिक पातळीवर सकारात्मक वातावरण राहील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
कधी कधी आपण हाती घेतलेलं काम इतकं अंगाशी येतं की सांगता येत नाही. त्यामुळे आर्थिक नुकसानही होतं. समोरच्या व्यक्तीला सर्व कळत असतं पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
काही भौतिक सुखाच्या वस्तू घेण्याची संधी मिळेल. पण त्या वस्तू एकदा का जवळ आल्या की त्याचं अप्रूप संपून जाईल. त्यामुळे उगाच पैसा खर्च केल्यासारखं वाटेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
आजचा दिवस एकदम मस्त जाईल. काही लोकांच्या भेटीगाठी होतील. ओळखीमुळे काही कामं पटापट होतील. भविष्याच्या दृष्टीने पैशांची बचत करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)