Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 6 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस आठवड्यातील ताण दूर करणारा असेल. नातेवाईकांच्या भेटीगठी होतील. लग्नसभारंभात जाण्याचा योग जुळून येईल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
आपल्याला काही गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. अनपेक्षितपणे घटना घडल्याने मानसिक धक्का बसेल. पण त्यातून सावरण्याशिवाय पर्याय नाही. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
4 / 10
चांगली संधी आली तर ती सोडू नका. कारण आपण दुसऱ्यांचा विचार करत बसलो तर पाठी राहू. त्यामुळे संधीचं सोनं करा आणि पुढे जा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
कामानिमित्त प्रवास करण्याचा योग जुळून येईल. पण प्रवासात काळजी घ्या. सामानाकडे लक्ष द्या. चोरी होण्याची भीती आहे. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
6 / 10
जवळच्या व्यक्ती आपला वापर करून घेतला की आपल्याला दूर सारतात. त्यामुळे त्याचा त्रास होईल. जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच पाठ फिरवल्याने संताप होईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
7 / 10
समाजात वावरताना काही नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांचा प्रभाव तुमच्यावर पडेल. पण आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.
8 / 10
आजचा दिवस मरगळ राहील. कोणत्याच कामात मन रमणार नाही. त्यामुळे आराम केलेला बरा राहील. कामंही नाही आणि आराम नाही असं नको व्हायला. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.
9 / 10
आपल्या तब्येतीची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. उगाचच अंगावर काही काढू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.
10 / 10
प्रत्येक दिवशी काही ना काही घडत असतं. आज काही सकारात्मक घडामोडी घडतील. त्यामुळे कामात अधिक लक्ष घाला.दिवसअखेर चांगले परिणाम मिळतील. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)